अतिवृष्टीमुळे परळी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी - तहसीलदार व्यंकटेश मुंडे
परळी प्रतिनिधी. कालपासून पडत असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे परळी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवहान तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
राज्यासह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे परळी तालुक्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत जोरदार झालेल्या पावसामुळे परळी तालुक्यातील पोहनेर, रामेवाडी, कासारवाडी, औरंगपूर, बोधेगाव, कावळ्याची वाडी, वानटाकळी, मलनाथपूर, परचुंडी, भिलेगाव, पिंपळगाव गाढे, कवडगाव साबळा, कवडगाव घोडा, आचार्य टाकळी, सरफराजपुर, गडदेवाडी आणि तेलसमुख या गावांचा संपर्क तुटल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान नदी नाले आणि ओढ्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा