परळी तालुक्यात पुराच्या पाण्यात चोघे गेले वाहून
तीघांना वाचविण्यात यश,एकजण बेपत्ता
परळी प्रतिनिधी. काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या लिंगी नदीवरील एका पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते . या पुराच्या पाण्यात चोघे जण वाहून गेले होते.त्यापैकी तीघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले असून अद्यापही एकजण बेपत्ता असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास मौजे दिग्रस तालुका परळी येथील युवक अमर पोळ वय २५ वर्षे, राहुल पोळ वय 30 वर्षे, राहुल नवले वय 23 वर्षे व ४ विशाल बल्लाळ वय २३ वर्षे दोघे राहणार पुणे हे परळी येथील लग्न समारंभातून कोडगाव हुडा मार्गे डिग्रस कडे बलेनो कार ने जात होते .रात्री अंधारात पुलावरील पुराचे पाण्याचा अंदाज न आल्याने व लाईट मध्ये पाणी न समजल्याने सदरील कार चारही व्यक्तीसह पाण्यात वाहून गेली .
सदरील घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस प्रशासन तसेच दिग्रस व कोडगाव हुंडा , पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेत रात्री १ ते ४ वाजेपर्यंत तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून नदीचे पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पोळ या एका व्यक्तीस बाहेर काढण्यात यश आले
मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह व अंधार यामुळे इतर तीन जणांना काढणे करिता पुढील मोहीम घेता येऊ शकत नव्हती .त्यामुळे सकाळी ६ वा पुन्हा उजेडताच प्रशासन व गावकरी तसेच पोहणारे भोई समाजाची व्यक्तींना सोबत घेऊन बचाव कार्य सुरू करून त्यातील ०२ व्यक्तींना राहुल पोळ व राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
परंतु चौथी व्यक्ती विशाल बल्लाळ ही अद्याप बेपत्ता असून तिला शोधण्याचे काम होणारे भोई यांच्यामार्फत चालू आहे. नगरपालिकेची टीम अर्ध्या तासात घटनास्थळी शोध घेण्यासाठी पोहोचत आहे .तसेच एन. डी. आर. एफ ची टीम पुण्याहून रवाना झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले आहे .या घटनेबाबत आ . धनंजय मुंडे,जिल्हधिकारी बीड व पोलीस अधिक्षक बीड तसेच हे लक्ष ठेवून असुन आवश्यक मार्गदर्शन व मदत बचावकार्यास स्थानिक प्रशासनास सहकार्य करत आहेत .
टिप्पणी पोस्ट करा