जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
सर्वसामान्यांचे प्रश्न निकाली निघण्यास होणार मदत
परळी (प्रतिनिधी.) परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांच्या उपस्थितीत महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी व विदयार्थी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन हे जनतेच्या दारी आल्याचे सांगून शेतकरी , सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सुविधा तत्पर व गतिमान पद्धतीने देण्यासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगुन बालविवाह रोखुन बालविवाह जिल्हयातुन हद्दपार करण्याचे आवाहन करुन सर्वाना बालविवाह व व्यसनमुक्तीबाबत शपथ दिली .तसेच सर्व नागरिक यांनी दर सोमवारी व गुरुवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत होणाऱ्या जनता दरबारमध्ये आपल्या समस्या रास्तपणे महसूल प्रशासनाकडे मांडून त्यांचे निराकरण करणेबाबत उपस्थित नागरिकांना आवाहन केले.
आजच्या शिबिरात जीवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारस फेरफार व सातबारा 21 शेतकऱ्यांना वितरित केली. इतर हक्कात नोंदी दुरुस्त केलेली सातबारा 13 शेतकऱ्यांना सातबारा वितरित केले . शेतरस्ते नोंदी केलेल्या
तीन शेतरस्स्ता सातबारा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केले . 40 विद्यार्थ्यांना उत्पन्न, रहिवासी ,जातीचे प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलियर व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वितरित केली .नैसर्गिक आपत्तीमध्ये विज पडून मयत झालेल्या जनावरांच्या मौजे दौनापूर व गुट्टेवाडी शेतमालकास शासकीय मदत दिली . मौजे बोरखेड येथील शेतकरी आत्महत्या कुटुंबास व मौजे सारडगाव येथील वीज पडुन जखमी झालेल्या व्यक्तीस शासकीय अनुदान मदत देण्यात आली . महिला व बाल विकास विभागाकडून चार लाभार्थ्यास बेबी किट वाटप करण्यात आली तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त मौजे मालेवाडी कुटेवाडी वाघाळा येथील चार कुटुंबीयांना तूर बियाणे मिनी किट वाटप करण्यात आले .
तीन शेतरस्स्ता सातबारा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केले . 40 विद्यार्थ्यांना उत्पन्न, रहिवासी ,जातीचे प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलियर व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वितरित केली .नैसर्गिक आपत्तीमध्ये विज पडून मयत झालेल्या जनावरांच्या मौजे दौनापूर व गुट्टेवाडी शेतमालकास शासकीय मदत दिली . मौजे बोरखेड येथील शेतकरी आत्महत्या कुटुंबास व मौजे सारडगाव येथील वीज पडुन जखमी झालेल्या व्यक्तीस शासकीय अनुदान मदत देण्यात आली . महिला व बाल विकास विभागाकडून चार लाभार्थ्यास बेबी किट वाटप करण्यात आली तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त मौजे मालेवाडी कुटेवाडी वाघाळा येथील चार कुटुंबीयांना तूर बियाणे मिनी किट वाटप करण्यात आले .
मोजणी खात्याकडून गावठाण हद्दीतील 10 शेतकऱ्यांना सनद वाटप व नकाशे यांचे वितरण केले . एकूण 99 शेतकरी व विद्यार्थी यांना विविध लाभाची वितरण जिल्हाधिकारी बीड यांच्या व अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई अश्विनी जिरंगे सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर तहसीलदार वेंकटेश मुंडे गटविकास अधिकारी संजय केंद्रे नाही तहसीलदार परवीन पठाण राजाभाऊ ढगे पुरवठा निरीक्षण अधिकारी सरपंच गोदावरी राजाराम मुंडे माजी पंचायत समिती सभापती पिंटू उर्फ बालाजी मुंडे श्याम आगाव टोकवाडी येथील रहिवासी असलेली डॉक्टर नामदेवा आघाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश घुगे पोलीस निरीक्षक मझर सय्यद मंडळ अधिकारी अरबी कुमटकर मंगल मुंडे नीता कोल्हेवाड गणेश फड विस्ताराधिकारी अंभोरे तालुका कृषी अधिकारी राठोड अव्वल कारकून बालाजी कचरे व महसूल विभागाची सर्व तलाठी यांची यावेळी उपस्थिती होती पण शाळेचे उद्घाटन महिला बचत गट प्रशाला स्वागत यांच्या उपस्थितीत करण्यात आले नाय तहसीलदार प्रवीण पठाण पुरवठा निरीक्षण अधिकारी अरे अजय भाऊ ढगे तालुका कृषी अधिकारी राठोड महिला व बालकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी अंभोरे वैद्यकीय अधिकारी सरपंच गोदावरी राजाराम मुंडे पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू मुंडे डॉक्टर राजाराम मुंडे शाळेचे मुख्याध्यापक व इतर गुरुजन वर्ग यांच्या उपस्थित करण्यात आले .
समाधान शिबिराची सुरुवात शाळेचे विद्यार्थी यांनी लेझीम पथकाच्या साह्याने जिल्हाधिकारी यांची स्वागत करून झाली. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वर्ष लागवड करून शाळेत नव्यानेच मान्यता मिळालेल्या आठव्या वर्गाचे उद्घाटन देखील जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रागंनात विविध महिला बचत गटाचे तसेच महिला व बालविकास विभाग, महसूल विभाग , पंचायत समिती विभागाचे विविध स्टॉल लावण्यात आले होते . त्याचबरोबर सामाजिक अर्थसहाय्य योजना व पुरवठा विभागाचे लाभार्थी तसेच शेतकरी फार्मर आयडी करिता व डीबीटी करिता विशेष पथकाते कॅम्प उभारण्यात आले होते . यामध्ये अनेक लाभार्थी यांनी आपले डीबीटी काम करण्याचा लाभ घेतला . टोकवाडी च्या सरपंच यांनी गावातील राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी बसविण्याची मागणी करून शाळेत विद्यार्थ्यांना जेवणासाठी एक हॉल बांधकामासाठी निधीची मागणी केली . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव यांनी केले. या समाधान शिबिरात तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हजर होते. तसेच परळी व पिंपळगाव गाढे या मंडळातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टोकवाडी येथील समाधान शिबिरानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व महसूल अधिकारी यांच्यासह तालुका क्रीडा संकुल परळी येथील जागेची पाहणी केली तसेच औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पास भेट दिली . यावेळी त्यांच्यासोबत मुख्य अभियंता इंगोले सुनील व मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे हे देखील उपस्थित होते . दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी यांनी सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांची तालुकास्तरीय आढावा बैठक घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत धर्मापुरी येथील किल्ला व केदारेश्वर मंदिर तसेच मरळसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर येथे भेट देऊन पुरातत्त्व विभागाचे वतीने चालू असलेल्या कामाची पाहणी करून गावकरी यांचेशी संवाद साधला.
टिप्पणी पोस्ट करा