वैद्यनाथ विद्यालयाच्या 15 शिक्षक कर्मचाऱ्यांकडुन रणजित देशमुख,सादेक इनामदाराच्या खोट्या तक्रारीची पोलखोल
शिक्षक दाखल करणार अब्रुनुकसानीचा सामुहिक दावा
परळी (प्रतिनिधी) येथील वैद्यनाथ विद्यालयातील तब्बल पंधरा शिक्षक कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या माहिती घेऊन तक्रारी करणारा रणजित देशमुख, सादेक इनामदार यांच्या तक्रारीत कसल्याच प्रकारचे तथ्य नसुन केवळ आमच्या कडून पैसे उखळणे,धमकावण्याच्या उद्देशाचा शिक्षकांनी पुरावे दाखवत पत्रकार परिषदेत पर्दाफाश केला असुन लवकरच आम्ही सामुहिक संबंधित खोट्या तक्रार दाखल करणाऱ्या लाचखोरावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असुन बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार साहेब, शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान मंगळवार दि.8 रोजी शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी बीड,पोलीस अधिक्षक व शिक्षणाधिकारी बीड यांच्यासह अधिकारी यांची शिक्षकांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देण्यात आले.या चर्चेत भ्रष्टाचा
पत्रकार परिषदेत यावेळी संबंधित शिक्षक म्हणाले की, वैद्यनाथ विद्यालयासी कुठलाही संबंध नसताना रणजित देशमुख व सादेक इनामदार यांच्या कडून ठराविक कर्मचाऱ्यानां जाणीव पूर्वक खोटी निवेदने व खोट्या माहितीच्या आधारे वर्तमान पत्रात बातम्या देऊन व शाळेत येऊन धमकावणे व ब्लकमेल करणे जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला जात जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून रणजीत देशमुख हा जाणीव पूर्वक शाळेतील कर्मचाऱ्यानां धमकावत आहे. मी माजी अध्यक्षांचा नातू आहे मीच तुमचा संस्थाचालक आहे. मला पैसे द्या नाहीतर तुम्हाला नौकरी वरून काढून टाकीन असे म्हणत धमकावत आहे. सादेक इनामदार या व्यक्तीस हाताशी धरून त्याने विविध कार्यालयामध्ये तक्रार निवेदने दिलेली आहेत. जे की पूर्णतः चुकीची आहे.
याच माहितीच्या आधारे त्याने वर्तमान पत्रात बातम्या देऊन शाळेची व शाळेतील कर्मचाऱ्यांची बदनामी केलेली आहे. शाळेमध्ये १५ ते 20 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांविरुद्ध खोट्या तक्रारी केलेल्या आहेत. त्याने ज्या ज्या कर्मचार्याच्या नावानिशी तक्रार दिलेली आहे ते मागील अनेक वर्षांपासून नियमित वेतन घेत आहेत. त्यामुळे वैद्यनाथ विद्यालयामध्ये सद्यस्थिती मध्ये कोणतीही भरती करण्यात आलेली नाही. कुणाचेही थकीत वेतन काढलेले नाही,ज्या कर्मचाऱ्याबाबत संबंधिताने तक्रार दिलेली आहे त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यानां त्यांनी तक्रार देण्या अगोदर संपर्क साधून ब्लकमेल करून पैशाची मागणी केली होती. ज्या लोकांनी त्यांच्या धमकीला बळी पडून काहीतरी चिरीमिरी त्याला व त्याच्या साथीदाराला दिली त्याचे नाव वगळून ज्यांनी चिरीमिरी दिली नाही त्यांची विरोधात तक्रार दिली आहे. ती सुद्धा तथ्य हिन आहे.जसे की, सन २०१७ मध्ये एकूण 17 शिक्षक अतिरिक्त झालेले असताना तक्रार अर्जामध्ये 10 शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नावे तक्रार दिली आहे. तसेच वरील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतर शाळेमध्ये झाले होते परंतु सदरील कर्मचाऱ्यांना संबंधित शाळेने रुजू न करून घेतल्यामुळे त्यांचे मूळ अस्थापानेवरून वेतन काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार ज्यांचे समायोजन झाले नाही त्यांचे वैद्यनाथ विद्यालयातून पगार निघत आहे.
यावरुन रणजीत देशमुख व सादेक इनामदार यांनी जाणीव पूर्वक काही ठराविक शिक्षकांना. लक्ष केल्याचे सिद्ध होते.सन २०१४ मध्ये पहिल्यांदा शालार्थ प्रणाली शासनाने कार्यान्वयित केली. तेव्हाच या शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ठ करण्यात आली होती. व तेव्हापासूनच हे शिक्षक कर्मचारी वेतन घेत आहे, त्यामुळे बोगस शालार्थ आयडी काढून लाखोंचे थकीत वेतन काढले हे म्हणणे संपूर्ण खोटे आहे. व तक्रार दराने वैयक्तिक वादातून पूर्वग्रह दुषित होऊन ब्लकमेल करण्याच्या हेतूने ही खोटी तक्रार दिली आहे. ज्या शिक्षकांच्या नियुक्ती दिनांकावर व वैयक्तिक मान्यतेवर तक्रार दराने आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये तोच जावक क्रमांक असणारे चार शिक्षक कर्मचारी आहेत. परंतु त्यांचे मात्र नाव तक्रार अर्जात घेण्यात आलेले नाही. यावरून तक्रारदाराने जाणीव पूर्वक जातीय द्वेषातून व आर्थिक तडजोडीतूनच ही तक्रार दिल्याचे सिद्ध होते.रणजीत देशमुख व सादेक इनामदार हे सातत्याने ज्या माजी मुख्याध्यापक मोदी यांच्या पत्राचा हवाला देवून संबंधित शिक्षकाची बोगस व बेकायदा भरती झाल्याचे सांगत आहेत. व जे कागदपत्रे ते दाखवत आहेत त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की, जानेवारी २०१७ मध्ये संस्थेचे संस्थापक सचिव भानुदासरावजी देशमुख यानी संस्थेचा ठराव देऊन मोदी यांना मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती दिली होती. मुख्याध्यापक झाल्यावर ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर मोदी यांनी शाळेत हजरच नव्हते त्यांचे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत ते कार्यरत नव्हते असे आक्षेप घेतलेले पत्र सादर केले होते. त्या सर्वांचा पगार मुख्याध्यापक म्हणून त्यांनीच पाठविला व त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे. त्यामुळे सदरचे कर्मचारी कार्यरत होतेच हे सिद्ध होते.
मोदी यांनी जो अहवाल दिलेला आहे त्यामागील कारणही तितकेच महत्वपूर्ण आहे. कारण संस्थापक सचिव यांचे नोव्हेंबर २०१७ मध्ये निधन झाल्यानंतर मोदी यांनी शाळेवर व संस्थेवर स्वतः चा कब्जा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने त्यांनी वरील कर्मचाऱ्यांसह इतर लोकांना अधिकार नसताना खोटी माहिती शिक्षण विभागाला देऊन काही ठराविक शिक्षक कर्मचाऱ्यांना बोलवून धमकी देऊन पैशाची मागणी केली. त्यावेळी ज्या लोकांनी त्याला पैसे दिले त्यांची काहीही तक्रार केली नाही परंतु ज्यांनी पैसे दिले नाही त्यांची बेकायदेशीर रित्या सेवा समाप्ती केली व ज्यांनी पैसे नंतर देतो असे कबुल झाले त्यांच्यावर काहीही कार्यवाही केली नाही. संजय गुट्टे, अमोल कटारे व इतर शिक्षक कर्मचारी यांची सेवा समाप्ती केल्यानंतर संबंधितांनी मा. शिक्षणाधिकारी श्री.भगवान सोनवणे यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन सदरील बेकायदेशीर कार्यवाहीची माहिती दिली. मा. शिक्षणाधिकारी साहेबांनी मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार संबंधितांची चौकशी झाली. व मोदी यांनी केलेले आरोप हे खोटे असून त्यांनी केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली.परंतु मोदी यांचे चीरीमिरीचे लालच कमी न झाल्यामुळे त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना तक्रारदाराप्रमाणेच ब्लकमेल करणे धमकावणे चालूच ठेवले या सर्व त्रासाला कंटाळून शाळेतील कर्मचार्याने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात मोदी विरोधात तक्रार दिली व त्या तक्रारीच्या अनुषंगाने मोदी यांना १५०००० (दीड लाख) रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ज्याची केस आजपर्यंत ही चालू आहे.
त्यामुळे वरील कागदपत्रे हे मोदीनी फक्त कर्मचाऱ्यांना ब्लकमेल करण्यासाठी व चिरीमिरी काढण्यासाठी बनविले होते.सदरील केस मध्ये अटक झाल्यानंतरही केवळ वैद्यनाथ शिक्षण संस्थेमध्ये कुणीही मान्यता प्राप्त संचालक नसल्यामुळे व बरेचसे बदल अर्ज प्रलंबित असल्यामुळे लाचखोर मोदी यांचे निलंबन झाले नाही. जामीन मिळाल्यानंतर ते परत शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. परंतु त्यांनी नंतर मात्र या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कुठेही तक्रार केली नाही. सर्वांचे नियमित वेतन काढले. यावरून सदरचे कर्मचारी हे नियमानुसार कार्यरत होते हे सिद्ध होते.मात्र रणजीत देशमुख व सादेक इनामदार २०२४-२०२५ मध्ये मात्र मोदींचे शिष्य म्हणून काम करत आहेत. व परत खोट्यानाट्या तक्रारी देऊन कर्मचाऱ्यानां परत ब्लकमेल करून धमकावून त्यांच्याकडून चिरीमिरी घेण्यासाठी शाळेची व कर्मचाऱ्यांची बदनामी करत आहेत. खोट्या बातम्या देत आहेत. सद्यस्थितीतील शिक्षणाधिकारी श्री. नागनाथ शिंदे यांच्या काळात कोणतीही नवीन भरती करण्यात आलेली नाही व नवीन भरतीनुसार कोणाचेही २ कोटी, 4 कोटी असे थकीत वेतन काढलेले नाही हे संपूर्ण भंपक बाजी आहे. लवकरच आम्ही सर्व कर्मचारी या दोघांविरुद्ध अब्रु नुकसानीचा ५ कोटीचा दावा देणार आहोत.विशेष बाब म्हणजे रणजीत देशमुख व सादेक इनामदार आमच्या शाळेमध्ये बेकायदेशीर रित्या कुणाची तरी नियुक्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकीव आहे. तो सादेक इनामदार याचा नातेवाईक आहे त्याच्याकडूनही या दोघांनी काहीतरी मोठी रक्कम घेत्लायचे समजले. सदरचे बेकायदेशीर काम करण्यासाठीच तो दबाव टाकण्यासाठी अशा खोट्या बातम्या देत आहे. कारण वरी नमूद केल्याप्रमाणे नोव्हेंबर २०१७ नंतर मान्यताप्राप्त कार्यकारणी अस्तित्वात नसल्यामुळे लाचखोर मोदी याला निलंबित करता आले नाही. त्याच प्रमाणे वैद्यनाथ विद्यालयामध्ये आज ही अधिकृत
नविन कार्यकारणी कार्यरत नसल्यामुळे तसेच MEPS act मधील तरतूद नुसार खाजगी संस्थेमध्ये नवीन नियुक्ती देण्याचे संपूर्ण अधिकार फक्त नि फक्त खाजगी व्यवस्थापनालाच असल्यामुळे सादेक इनामदार यांच्या नातेवाईकाचे बेकायदेशीर नियुक्तीचे काम होत नसल्यामुळे हे दोघे अशा प्रकारची खोटी माहिती देवून,खोट्या बातम्या देवून शाळेतील कर्मचाऱ्यांवर व शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयावर दबाव टाकत आहेत. परंतु यांच्या खोट्या बोगस तक्रारी आहेत असे पत्रकार परिषदेत शिक्षकांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत संजय सोपान गुट्टे (स.शि.),देशमुख प्रतिभा प्रसादराव (स.शि.),लोखंडे राणी तुकाराम (स.शि.),कटारे अमोल बालासाहेब (स.शि.),भोसले वैशाली विठ्ठलराव (स.शि),देशमुख गोविंद गुलाबराव (स.शि.), आरसुळे ज्योती बालकृष्ण (स.शि.), सातपुते विष्णू लिंबाजी (लिपीक),काळमळी जगन्नाथ वैजनाथ (लिपीक), रोहित प्रमोद काळे (लिपीक),देशमुख शारदा गुलाबराव (स.शि.), शर्मा पुनम दिपक (स.शि.),अंजली अशोक कुटे (स.शि.), बाबासाहेब संतराम किरवले (स.शि.)शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा