लोणारवाडी येथील मुख्यमंत्री ग्राम सडक विकास योजनेतंर्गत बोगस रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी
परळी प्रतिनिधी परळी तालुक्यातील मौजे लोणारवाडी येथे पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु पाच वर्षे झाली तरी अद्याप हा रस्ता पूर्ण झाला नसून काम न करताच बोगस बीले उचलली गेल्याचा आरोप करीत याप्रकरणी शासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी लोणारवाडीचे माजी सरपंच नवनाथ मुंडे यांनी केली आहे.
चार किलोमीटरचा लोणारवाडी गावाला जोडणा-या रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे बोगस काम दाखवून कोट्यावधी रुपयांचे बिले उचलून संबंधित अधिकारी व मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाची तसेच जनतेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रस्ता पूर्ण न झाल्याने लोणारवाडी येथील गावकऱ्यांना, विद्यार्थी ,तसेच वयोवृद्ध आणि महिलांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत
आहे.
आहे.
सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात तर महिला व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळेत जातांना, वाहनधारकांना कसरत करावी लागते आहे.या प्रश्नी वेळोवेळी अधिका-यांना कामा संदर्भात विचारणा केली परंतू त्यांनीही कोणताही प्रतिसाद न देता उलट या कामातील भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. दोन कोटी रुपयांच्या या भ्रष्ट व बोगस कामाची चौकशी करून याप्रकरणी शासनाने चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच नवनाथ मुंडे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा