अंबाजोगाईत लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयाबाहेर ठेवला भाजपच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या गावातील दुर्दैवी घटना



अंबाजोगाईत लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयाबाहेर ठेवला

 भाजपच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या गावातील दुर्दैवी घटना 



अंबाजोगाई प्रतिनिधी.    भारतीय जनता पार्टीच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या गावात (अंबाजोगाई) लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयासमोर ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील ही गंभीर घटना आहे. अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे, मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी गैरसोय झाली. यामुळे संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर मृतदेह ठेवून आपला निषेध व्यक्त केला.


   अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभुमि बाराखांबी परिसरात आहे . तेथील जागा पुरातत्व खात्याने अतिक्रमित केली आहे . त्यामुळे स्थानिक लिंगायत नागरिकांच्या अंत्यविधी साठी जागा राहिली नाही . तेथे अंत्यविधी साठी विरोध केला जातो .नगरपालिकेचे निवृत्त कार्यालयीन अधिक्षक कै . गणपत अप्पा वाघमारे (रा रविवारपेठ ) यांचे पार्थिव रविवारी नगर परिषद कार्यालयासमोर आणून लिंगायत बांधवांनी ठिय्या अंदोलन केले.
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने