बेलंबा येथील धोकादायक पुलाने घेतला तरुणाचा बळी, यापूर्वी घडल्या अनेक घटना

बेलंबा येथील धोकादायक पुलाने घेतला तरुणाचा बळी, यापूर्वी घडल्या अनेक घटना 


परळी प्रतिनिधी.      तालुक्यातील बेलंबा येथे गावातून नवीन दलित वस्तीकडे जाणा-या धोकादायक पुलाने एका तरुणाचा बळी घेतल्याची घटना काल रात्री घडली आहे. दरम्यान या पुलावर यापूर्वी अशा अनेक घटना घडल्याचे समजते त्यामुळे हा पूल गावकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, परळी पासून जवळच असलेल्या मौजे बेलंबा येथे काल दिनांक 13 जुलै रोजी रात्री आठच्या दरम्यान अरुण मधुकर रोडे वय वर्ष 35 हा दलित तरुण गावातून बेलंबा गावाला खेटून असणाऱ्या नदीवरील पुलावरून आपल्या घराकडे जात होता. यावेळी या पुलाला कठडे नसल्याने तसेच पुलावर कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नसल्याने अंधारात त्याला काही कळले नाही. या पुलाला संरक्षक कठ
डे नाहीत.
   त्यामुळे या अंधारात पुलावरून जात असताना अरुण रोडे यांचा तोल गेल्याने सदर युवक खाली पडला व त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याच पुलावरून यापूर्वीही गावातील अनेक जण खाली पडल्याचे बोलले जात आहे. तरीही हा गावासाठी जीवघेणा ठरलेला पूल नव्याने चांगला व संरक्षित बांधणे गरजेचे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने