योगा दिन आणि शनिवार
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती
परळी प्रतिनिधी शनिवार म्हणजे महाराष्ट्रात शासकीय कार्यालय आणि अधिकाऱी व कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीचा दिवस. परंतु आज 21 जून 2025 शनिवार रोजी भारतात योगा दिन सर्वत्र संपन्न होत असल्याने परळी शहरातही उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तसेच तहसीलदार व्यंकटेश मुंडे व परळी
नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे हे योग दिनास उपस्थित राहून स्वतः योगात सहभागी झाले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे हे योग दिनास उपस्थित राहून स्वतः योगात सहभागी झाले.
शहरातील जिजामाता उद्यानात आज सकाळी संपन्न झालेल्या योग कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे व मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा