अमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
सोनपेठ: येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रमुख पाहुणे रामेश्वर कदम, प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. शेख शकीला व प्रा. डॉ. संतोष रणखांब होते.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधी दिन म्हणून 26 जून पाळला जातो. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या कुठल्याही व्यसनात अडकू नये व याबाबत कायदेशीर पद्धतीने तस्करीला आळा घालण्यासाठी समाजातील घटक म्हणून मदत करावी यासाठी त्यांच्यामध्ये जागृतीच्या उद्देशाने मार्गदर्शन केले.
अमली पदार्थामुळे अनेक देशांची प्रगती खुंटल्याची उदाहरणे आहेत. अशा पदार्थांच्या सेवनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. व्यक्तिगत जीवनामध्येही अतिशय वाईट पद्धतीने अमली पदार्थाच्या सेवनामुळे जी
वन जगावे लागते म्हणून अशा घटकांपासून आपण दूर राहावे! असे मत अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी व्यक्त केले.
वन जगावे लागते म्हणून अशा घटकांपासून आपण दूर राहावे! असे मत अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी रामेश्वर कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती बोबडे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेख शकीला तर आभार प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी व्यक्त केले. या प्रसंगी प्रा. डॉ. गोविंद वाकणकर, प्रा. भास्कर मगर, प्रा. सुरेश मोरे, प्रा. संतोष वडकर, प्रा. सतिष वाघमारे, प्रा. मंगल गव्हाणे, प्रा. महालिंग मेहेत्रे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. प्रशांत पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा