विकसित महाराष्ट्र - उद्योग संवाद' कार्यक्रमात मराठवाड्याचा ठसा "मराठवाड्यासाठी नव्या औद्योगिक युगाची हाक – भरत गीते यांनी उभारले विकासाचे स्पष्ट चित्र"

'विकसित महाराष्ट्र - उद्योग संवाद' कार्यक्रमात मराठवाड्याचा ठसा

"मराठवाड्यासाठी नव्या औद्योगिक युगाची हाक – भरत गीते यांनी उभारले विकासाचे स्पष्ट चित्र"


मुंबई - 

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे ‘विकसित महाराष्ट्र – महाराष्ट्र उद्योग संवाद’ या राज्यस्तरीय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडले. राज्यातील आघाडीचे उद्योजक, धोरणकर्ते व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी झाले.

या संवादात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करताना तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच 'अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे श्री. भरत गीते यांनी आपले अभ्यासपूर्ण, सुसंगत आणि प्रेरणादायी विचार मांडले.

मराठवाडा हा अपार
औद्योगिक संधी असलेला प्रदेश आहे. येथे पायाभूत सुविधा, वीज, पाणी, जमीन, प्रशिक्षण आणि धोरणात्मक सहकार्य मिळाल्यास, हा भाग देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ठरू शकतो. यासाठी स्वतंत्र ‘मराठवाडा व्हिजन डॉक्युमेंट’ची गरज आहे. असे भरत गीते यांनी ठामपणे सांगितले.


सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी स्वतंत्र युनिट्स – शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाची संधी तसेच सौर, पवन आणि इथेनॉल प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीचे व्यापक क्षेत्र, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित पर्यावरणपूरक औद्योगिक धोरणांची आवश्यकता. स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीला प्राधान्य या चर्चासत्रात फक्त अडचणी आणि त्यावरील उपाय त्यास शासनाच्या धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता यावर त्यांनी विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान श्री. भरत गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही सविस्तर चर्चा करत, मराठवाड्यासाठी विशेष औद्योगिक धोरण राबवावे अशी ठाम मागणी केली.

“मी एक भुमिपुत्र आहे. माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे मराठवाड्याच्या युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचा हेतू असतो,” असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

भरत गीते यांचे भाषण ‘विकसित महाराष्ट्र’ या संवादामधील एक ठळक व प्रेरणादायी क्षण ठरले. त्यांनी मांडलेले मुद्दे मराठवाड्याच्या औद्योगिक भविष्यासाठी नव्या दिशेचा प्रारंभ ठरू शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने