कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही भूमाफिया कडून बीडमध्ये जमिनीची सर्रास विक्री पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी - सलिम चिस्ती

कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही भूमाफिया कडून बीडमध्ये जमिनीची सर्रास विक्री

पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी - सलिम चिस्ती

बीड प्रतिनिधी.    न्यायालयाने मनाई हुकूम दिलेला असताना तसेच बीड येथील सर्वे नंबर 28 मधील काही प्लॉटचा वाद न्यायालयीन प्रविष्ट असताना भूमाफियांकडून बेकायदेशीरपणे सर्रास जमिनीची विक्री केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष देऊन कारवाई करावी व  मूळ मालकांना संरक्षण व न्याय देण्याची मागणी  चिस्ती सलीम अहेम  गुलाम यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे केली आहे.
   प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात चिस्ती यांनी पुढे म्हटले आहे की, बीड शहरातील तेलगाव नाका येथील आदित्य कॉलेज समोर सर्वे नंबर 28 आहे. या सर्वे नंबर 28 ला सर्वे नंबर 29 दाखवून बीड मधील भूम माफीयांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी 2010 -  2011 यावर्षी नवीन रजिस्टरी केली. ही बाब मूळ प्लॉट धारकांना लक्षात आल्यानंतर याविषयी कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले. यावर कोर्टाने मनाई हुकूम दिलेला आहे.
   कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही बेकायदेशीरपणे प्लॉट विक्री करून लाखो

रुपये व माफिया कमावित आहेत. तसेच सदरील जागेचे मालक या जागेवर गेले तर त्यांना गुंडा मार्फत धमकाविले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.  प्लॉट मालकामध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तसेच काहीजण बीड बाहेर राहत असल्याचा फायदा हे भूमाफिया घेत आहेत.
    दरम्यान बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कुमावत साहेब यांनी याप्रकरणी लक्ष घालून मूळ जमीन मालकांना न्याय देण्याची मागणी चिस्ती सलीम अहेम गुलाम यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने