परळीत तरुणाचे फिल्मी स्टाईल अपहरण
रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
परळी प्रतिनिधी. परळी शहरात काल सायंकाळी फिल्मी स्टाईलने एका तरुणाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली असून दरम्यान रात्री उशिरा याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत गजबजलेल्या टावर ते गणेशपार रस्त्यावर मॉडर्न महाविद्यालयासमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाला अचानक रस्त्यावर आलेल्या दोन गाड्यातील तरुणांनी घेराव घातला आणि उचलून गाडीत टाकले व घटनास्थळावरून वेगाने पसार झाले.
सदर तरुण शहरातील बरकत नगर भागातील रहिवासी आहे. या घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली तसेच पालकांम
ध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी परळी शहरातील प्रसिद्ध उद्योजक डुबे यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर अपहरणाची दुसरी घटना काही दिवसातच घडली आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे. जागोजागी असणारे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

दरम्यान काल दिनांक 6 मे रोजी रात्री 11 वाजता संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 140 (3) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा