महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या परळीत विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
ओबीसी नेते प्रा. टी.पी. मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
परळी प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 11 एप्रिल रोजी परळी शहरात विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शहरातील पत्रकार भवन येथे शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्रातील ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगका
र रानबा गायकवाड हे आहेत. कार्यक्रमास जेष्ठ नेते माधवराव ताटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने ,माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथराव गायकवाड ,परळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत , प्रसिद्ध विचारवंत अजयकुमार गंडले,लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे , सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, माजी नगरसेवक महेंद्र रोडे ,बीड जिल्हा मुफ्टा शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे, फुले, शाहू,आंबेडकरी अभ्यास समुहाचे भगवान साकसमुद्रे, आदर्श शिक्षक दिलीप भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठलराव झिलमेवाड, कवी बालाजी कांबळे, पत्रकार विकास वाघमारे, नवनाथ दाणे, विद्याधर शिरसाठ, विनायक काळे ,आकाश देवरे, सम्राट गायकवाड आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा