सेन्सॉर बोर्डाची ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी - डॉ. सिद्धार्थ तायडे
पँथर नामदेव ढसाळ यांचा अवमान साहित्यिक-कलावंत कदापि सहन करणार नाहीत - रानबा गायकवाड
परळी प्रतिनिधी. फिल्म सेन्सॉर बोर्डाची ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी असल्याचे प्रतिपादन सिने-नाट्य कलावंत संघटनेचे संस्थापक सचिव प्रख्यात अभिनेता-लेखक-दिग्दर्शक डॉ.सिद्धार्थ तायडे यांनी केले. तर पँथर नामदेव ढसाळ यांचा अवमान साहित्यिक-कलावंत कदापि सहन करणार नाहीत अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक-संपादक तथा सिने-नाट्य कलावंत संघटनेचे उपाध्यक्ष रानबा गायकवाड यांनी सेन्सॉर बोर्डाचा निषेध केला आहे.
लेखक-दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोकवर्गणीतून तयार केलेल्या 'चल हल्ला बोल' या चित्रपटातील कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. तसेच, सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नामदेव ढसाळ यांच्याविषयी "कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही" असं उद्दाम वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ परळी वै. सिने-नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने मा. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय, परळी वैजना
थ यांना निवेदन सादर करण्यात आले.
थ यांना निवेदन सादर करण्यात आले.
दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली असून, सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सूचविले आहेत. तसेच, नामदेव ढसाळ यांच्या कवितांमधील शिव्या आणि अश्लीलतेचं कारण देत त्या चित्रपटातून हटवण्यास सांगितले आहे.
अधिकाऱ्याचं उद्दाम वक्तव्य:
चित्रपटाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नामदेव ढसाळ यांच्याविषयी "कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही" असं उद्दाम वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि नामदेव ढसाळ यांच्या कार्याचा अपमान करणारं आहे.
या घटनेचा निषेध म्हणून परळी वै. सिने-नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने मा. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय, परळी वैजनाथ यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सेन्सॉर बोर्डाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
'चल हल्ला बोल' चित्रपटातील कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर घेतलेला आक्षेप तात्काळ मागे घ्यावा. कवी नामदेव ढसाळ यांच्याविषयी उद्दाम वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य कारवाई करावी. सेन्सॉर बोर्डाने भविष्यात अशा प्रकारची कृती टाळावी.
या निवेदनावर सिने-नाट्य कलावंत संघटनेचे उपाध्यक्ष रानबा गायकवाड, संस्थापक-सचिव डॉ. सिद्धार्थ तायडे, सदस्य प्रकाशसिंग तुसाम, विठ्ठलराव झिलमेवाड, विकास वाघमारे, नागेश्वर खंदारे, विद्याधर शिरसाट, विनायक काळे , वैजनाथ रायभोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.


टिप्पणी पोस्ट करा