भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा नुतन कार्यकारिणीची निवड
गणपत गायकवाड यांची नांदेड उत्तर तर हौसाजी वारघडे नांदेड दक्षिण अध्यक्षपदी निवड
नांदेड ( सुभाष सवाई, नांदेड जिल्हा प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा नुतन कार्यकारिणीची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.गणपत गायकवाड यांची नांदेड उत्तर तर हौसाजी वारघडे यांची नांदेड दक्षिण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये हणमंते सर,लोणे सर, तसेच सोनकांबळे सर आदि उपस्थित होते.भारतीय बौद्ध महास
भेचे नांदेड जिल्हा नुतन कार्यकारिणी याप्रमाणे. आयु. गणपतजी गायकवाड- अध्यक्ष नांदेड उत्तर, आयु. हौसाजी वारघडे साहेब- नांदेड दक्षिण अध्यक्ष.तर उर्वरित
भेचे नांदेड जिल्हा नुतन कार्यकारिणी याप्रमाणे. आयु. गणपतजी गायकवाड- अध्यक्ष नांदेड उत्तर, आयु. हौसाजी वारघडे साहेब- नांदेड दक्षिण अध्यक्ष.तर उर्वरित
दामोदर सरकटे- सरचिटणिस सुभाष नरवाडे - जि. कोषाध्यक्ष, सुरेशजी लोकडे - संस्कार उपाध्क्ष, नागराज कांबळे- पर्यटन उपाध्यक्ष, आयु सा. ना. भालेराव साहेब- कार्यालयीन सचिव, रविकिरण जोधंळे, - राज्य संघटक , बळीराम कसबे- पर्यटनसचिव. अशा प्रकारे नांदेड जिल्हा उत्तर, दक्षिण कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या नुतन कार्यकरणीचा सत्कार सोहळा सुपर मार्ट व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळ यांच्या वतीने करण्यात आला. या सत्कार सोहळयाच्या निमिताने अनेक मान्यवरानी मार्गदर्शनही केले. यामध्ये एडवोकेट गोणारकर यांनी सुंदर असे मार्गदर्शन करताना नवीन कार्यकारिनी कडून अपेक्षा व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की,जिल्हयातील प्रत्येक नागरिकापर्यंत आपण पोहचले पाहिजे. वैश्विक पातळीवर प्रचार करणारा बौद्ध धम्म आहे असे ते म्हणाले.माजी न्यायाधीश यशवंतजी चावरे साहेब शुभेच्छा देताना सांगितले की,मंगल परिणय हे एका पोट जातीतून दुस-या पोटजातीत लावण्याचे काम या कार्यकारिणीने केले पाहिजे. या माध्यमातून वैद्यकिय सेवा शिबीर, कायदेविषयक सेवा, समाजातील मजूर व महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.यानंतर दामोदरजी सरकटे यांनी या संस्थेत काम करीत असताना आचार संहितेचे पालन झाले पाहिजे व गाव तिथे भारतिय बौद्ध महासभेची शाखा तयार करावी असे मत व्यक्त केले.याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.विलासराज भद्रे यांनीही मार्गदर्शन केले.
नांदेड उत्तरचे नुतन अध्यक्ष यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की सर्वच क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी याचे श्रामण शिबीर येत्या कांही दिवसात घेण्याची आमची तयारी असून येणारी बाबासाहेबांची जयंती डी. जे. मुक्त, बॅनर मुक्त करणार आहोत. सर्वानी मार्गदर्शन करताना ज्या अपेक्षा केल्या आहेत, आवहाने केली आहेत. त्यानुसार काम करू. धम्म परिषदे शिवाय शिक्षण परिषदा घेऊन तरुणाना व्यवसायभिमुख बनविण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले .
यानंतर अध्यक्षीय समारोप करताना रमेश दुधमल यांनी राजमुद्रा सुपर मार्ट व बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडाळाच्या वतीने हा नुतन कार्यकारिणीच्या सत्कार सोहळयाचे आयोजन केले आहे. मी व माझे सर्व सहकारी तन मन धनाने भारतीय बौद्ध महासभेच्या सदैव सोबत आहोत असेही ते म्हणाले,यानंतर कार्यकर्माचे अध्यक्ष व सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या सत्कार सोहळयाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये आयु. घोडगे, पंडीत , नवनाथ अबेंकर, राजमुद्रा मार्टचे सभासद व संथागार विहार समिती अध्यक्ष आयु. संभाजी वाठोरे , नुतन कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारी, धम्म भगीनी व समता सैनिक दलाचे सदस्य, मुप्टा शि. सं. मा. ता. अध्यक्ष परळी वै. तथा दै. परळी बुलेटीनचे नांदेड प्रतिनिधी व ईतर अनेक मान्यवर उपासक, उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचलन निलेश बोधने यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा