दोन दिवस चकरा मारूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास केली टाळाटाळ
परळी शहरातील घरफोडीची घटना
परळी प्रतिनिधी परळी शहरातील शिवाजीनगर थर्मल कॉलनी येथील राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी चोरी झाल्यानंतर चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे दोन दिवस चकरा मारल्या. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी
संबंधित घरमालकाने पुन्हा एकदा पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी केली आहे.
संबंधित घरमालकाने पुन्हा एकदा पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर थर्मल कॉलनी येथील निवृत्ती हरिभाऊ घुंबरे यांचे घर आहे. ते संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सुध्दा काही दिवस राहत असतात. ते संभाजीनगरला गेले असताना परळीतील त्यांच्या घरी दिनांक 20 जानेवारी रोजी चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घराच्या कपाटातील रोख 1 लाख 40 हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
याप्रकरणी घुबंरे यांनी दिनांक 21 तसेच दिनांक 22 जानेवारी रोजी प्रत्यक्ष संभाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन घडलेली चोरीची घटना सांगितली. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे घर प्रत्यक्ष जाऊन बघून आले. परंतु पुढे कोणतेच कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी आज दिनांक 31 जानेवारी रोजी पुन्हा निवृत्ती हरिभाऊ घुबंरे हे आपला लेखी तक्रार अर्ज घेऊन संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेले आहेत. व या अर्जाद्वारे त्यांनी घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा