मूकनायकाचा मी सैनिक
समाज परिवर्तन आणि समाज जागृतीसाठी वृत्तपत्र अतिशय प्रभावी माध्यम आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. यासाठीच त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक सुरू केले आणि लाखो करोडो उपेक्षित बहुजनांचा बाबासाहेब आवाज बनले. आवाज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्या सामाजिक लढ्याला वृत्तपत्रांची धार दिली. शब्दांच्या माध्यमातून प्रस्थापित आणि मनुवादी व्यवस्थेवर आसूड ओढ
ले.
ले.
बाबासाहेबांच्या या क्रांतिकारी विचारधारेचा मी एक सैनिक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बातम्यांनी काय फरक पडतो असे म्हणणाऱ्यांना जेव्हा एखाद्या बातमीने खळबळ माजते,आंदोलने होतात, हजारो लोक रस्त्यावर उतरतात, सरकारला दखल घ्यावी लागते आणि अन्याय अत्याचार झालेल्या व्यक्तीला, समाजाला न्याय द्यावा लागतो. ही ताकद असते एखाद्या निर्भीड बातमीमध्ये.
हीच निर्भीड पत्रकारिता आजपर्यंत करत आल्याचा मला आनंद आहे. माझी लेखनी ,माझी पत्रकारिता ही अशा अनेक अन्य अत्याचार झालेल्यांच्या कामी आली .आणि घटनांमध्ये जिथे पोलीस दखल घेत नव्हते .तेव्हा त्या घटनेचे बातमी केल्यानंतर पोलिसांना प्रशासनाला दखल घ्यावी लागली. गुन्हे दाखल करावे लागले. ॲट्रॉसिटी सारख्या प्रकरणात अन्याय होऊनही ,पोलीस जेव्हा चार-चार दिवस साधी फिर्याद दाखल करून घेत नाहीत अशा घटनांमध्ये अनेक वेळा बातमीचा दणका द्यावा लागला. बातमीच्या माध्यमातून असे शेकडो प्रकरणं उघडकीस आणली.
आज मूकनायक दिनाच्या निमित्ताने या क्रांतिकारी पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्व संपादक, पत्रकार बांधवांना व सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
रानबा गायकवाड
दैनिक सम्राट,दै.परळी बुलेटीन
टिप्पणी पोस्ट करा