भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळीत भव्य संविधान गौरव रॅली संपन्न
सर्वधर्मीय नागरिक व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
परळी प्रतिनिधी. भारतीय संविधानाला 26 जानेवारी 2025 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने देशभर संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने परळी शहरात संविधान अमृत महोत्सव समितीच्या वतीने भव्य संविधान गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील सर्वधर्मीय तसेच सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून सायंकाळी चार वाजता या संविधान गौरव रॅलीची सुरुवात करण्यात आली. सजविलेल्या ट्रॅक्टर मधून भारतीय संविधानाचे प्रतिकृतीची तसेच भारतीय घटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची यावेळी या रॅलीत मिरवणुक काढण्यात आली. तसेच परळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी संस्थांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी गणवेश यामध्ये सहभागी झाले होते. भारतीय संविधानाच्या महत्त्व पटवून देणारे घोषवाक्य वि
द्यार्थी तसेच नागरिकांच्या हातामध्ये दिसत होते.
द्यार्थी तसेच नागरिकांच्या हातामध्ये दिसत होते.
या रॅलीमध्ये परळी शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते , पत्रकार सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करणारी तसेच संविधानाचे गौरव करणारे गीते रॅलीमध्ये वाजत होती. हे संविधान गौरव रॅली राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा मार्केट, स्टेशन रोड, एक मिनार चौक ते रेल्वे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जन करण्यात आले.
संविधान गौरव रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर शहरातील डॉ.झाकीर हुसेन ज्युनिअर कॉलेजच्या मुस्लिम विद्यार्थिनींनी भारतीय संविधानावर गीत सादर केले. त्यानंतर विविध पक्षांच्या प्रमुखांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच संविधान गौरव समितीच्या वतीने शहरातील विविध पक्ष, संस्था, बौद्ध विहारे, संघटना यांच्या प्रमुखांना 75 संविधानाच्या प्रती देऊन सत्कार करण्यात आला.
या रॅलीचा समारोप भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाल्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. ही संविधान गौरव रॅली यशस्वी करण्यासाठी संविधान अमृत महोत्सव समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातामध्ये भारतीय तिरंगा ध्वज फडकत होते.
टिप्पणी पोस्ट करा