परभणीत संविधानाची तोडफोड, परळीत संविधान प्रेमींची तीव्र निदर्शने

परभणीत संविधानाची तोडफोड, परळीत संविधान प्रेमींची तीव्र निदर्शने 

परळी प्रतिनिधी.     परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवण्यात आलेल्या संविधानाची तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी याचा निषेध म्हणून तसेच जातीवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परळीतील संविधान प्रेमींच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
    परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काल जातीयवाद्याने द
गडफेक करून तोडफोड केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या अनुषंगानेच परळी वैजनाथ येथे आंबेडकरी समाज व अनुयायांच्या वतीने या घटनेचा निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. 
   राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे जमा होऊन कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. व आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.त्याचप्रमाणे या माथेफिरूच्या पाठीशी असलेल्या सूत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार यांना तहसील निवेदनाची प्रत देण्यात आली.यावेळी निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने