परळी तहसीलचे पुरवठा निरीक्षक कचरे यांचा स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन गौरव
परळी वैजनाथ , प्रतिनिधी :- परळी वैजनाथ तहसील कार्यालयातील अव्वल कारकून तथा पुरवठा निरीक्षक बी. बी. कचरे यांचा नुकताच स्वातंञ्य दिनानिमित्त बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याहस्ते उत्कृष्ट कर्मचारी म्ह
णुन गौरव करण्यात आला.
णुन गौरव करण्यात आला.
जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत दिला जाणारा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार/गौरव २०२४ श्री . बी. बी. कचरे, पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय परळी वैजनाथ यांना जिल्हा अधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते पुरस्कार देवुन गौरव करून सत्कार करण्यात आला.
अंबाजोगाई येथे नुकतेच संपन्न झालेल्या स्वातंञ्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभात पुरवठा निरीक्षक बी. बी. कचरे यांचा त्यांनीँ मागील कांहि वर्षामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन शाल, श्रीफऴ व स्मृतीचीन्ह देउन गौरव करण्यात आला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार व अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.या सत्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा