डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या
कोण होणार परळीचा ज्युनिअर सायंटीस्ट स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा-प्रा.कैलास घुगे
परळी/ प्रतिनिधी-
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने परळी शहरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अकॅडमीच्या वतीने दि. 27 जुलैपासून सुरु असलेल्या कोण होणार परळीचा ज्युनिअर सायंटीस्ट या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या विद्यार्थ्यांना भरगच्च असे पारितोषीकांसह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास शुद्ध सोन्याने बनविलेले 1.5 ग्रॅमचे गोल्ड मेडल, द्वितीय-शुद्ध चांदीचे मेडल (ग्रॅम) व तृतीय विजेत्यास शुद्ध पंचधातूचे मेडल बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. तरी परळीसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अकॅडमीचे संचालक प्रा. कैलास घुगे यांनी केले आहे.
परळी शहरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अकॅडमीच्या वतीने कोण होणार परळीचा ज्युनिअर सायंटीस्ट या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा प
रीक्षा दोन गटात होत असून इ. 5 वी ते ७ वी एक गट व इयत्ता ८ वी ते १० वी दुसरा गट असेल. ही स्पर्धा परीक्षा फीजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयांवर असून प्रथम वस्तूनिष्ठ प्रश्न हे प्रत्येक विषयाचे दहा असतील. एकूण ३० प्रश्नांची व ६० गुणांची असेल. ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आपआपल्या शाळेत असेल. ही स्पर्धा परीक्षा तीन लेव्हल मध्ये घेण्यात येणार आहे. शाळेतील परिक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी स्पर्धा परीक्षासाठी पात्र समजले जाईल. ही परीक्षा डॉ. ए. पी. जे. अब्दुल मलाम अकॅडमी मध्ये तारीख कळवून घेतली जाईल. तसेच दीर्घोत्तरी परीक्षेतून निवडलेले विद्यार्थी हे प्रॅक्टीकल परीक्षासाठी पात्र असतील. अशा पद्धतीने ह्या तीन लेव्हल असतील. विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकास, विज्ञान शिक्षकांस व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अकॅडमीस संपर्क करावा. या स्पर्धा परीक्षा माहे ऑगस्ट मध्ये आपआपल्या शाळेत होत आहेत तसेच प्रत्येक शाळेतुन तीन विद्यार्थी निवडले जाणार आहेत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती उत्सव दिनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून बक्षिस वितरण केले जाणार आहे. तरी सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमीचे संचालक कैलास घुगे यांनी केले आहे.

-बालवयातच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करणे हा उद्देश
बालवयात विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना ओळखून शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताच्या विकासात योगदान देता यावे या दृष्टीने आमचा विशेष प्रयत्न असतो. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या बौद्धीक क्षमतेचा विचार करुन त्याला त्या दृष्टीने वाटचाल करण्यास प्रोत्साहीत करण्याचे काम आमच्या अकॅडमीच्या माध्यामातून करण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यामध्ये भविष्यात आपली वाटचाल कोणत्या क्षेत्रात असली पाहीजे, विद्यार्थ्यांनी कुठल्या क्षेत्रात अधिक प्रगत होऊन स्पर्धेच्या या युगात टिकून राहील पाहीजे या सर्व गोष्टी आम्ही अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा आमचा कल असतो.
-प्रा.डॉ. रामेश्वर बांगड
संचालक, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अकॅडमी
टिप्पणी पोस्ट करा