शालेय विद्यार्थिनीच्या अपहरणाने परळी शहर हादरले,पालकांत भितीचे वातावरण

शालेय विद्यार्थिनीच्या अपहरणाने परळी शहर हादरले,पालकांत भितीचे वातावरण

परळी प्रतिनिधी.       शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना दिनांक 30 मार्च रोजी घडल्याने परळी शहर हादरले आहे.दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे पालक वर्गात भितीचे वाताव
रण निर्माण झाले आहे.
    याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शक्तीकुंज वसाहतीत इयत्ता आठवीत  शिक्षण घेणारी विद्यार्थिनी 30 मार्च रोजी सकाळी 10 नंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले.सदर मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
    दरम्यान या घटनेने परळी शहरात पालकवर्गात खळबळ उडाली आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने