मराठा आंदोलनास येड्याची जत्रा म्हणणाऱ्या चितळेला येड्याच्या इस्पितळाची खरी गरज
तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रत एकही कार्यक्रम होऊ देणार नाही - सेवकराम जाधव
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
ब्राम्हण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमात केतकी चितळे जे बरळली त्याची शिक्षा तिला मिळणारच आहे. परंतु स्वतःचे तोंड आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी काहीही बेताल बरळू नये हे पण तितकेच खरे आहे. यापुढे कुठल्याही कार्यक्रमात बोलताना तोंडाला लगाम लावावा नसता संभाजी ब्रिगेड चितळे बाईंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही. असा ईशारा संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी दिला आहे.
परळी वैजनाथ येथे झालेल्या ब्राम्हण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अट्रॉसिटी हे रॅकेट असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत तक्रार दाखल केली आहे. याच कार्यक्रमा दरम्यान मराठा यौद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षण आंदोलनास येड्याची जत्रा म्हणून हिनवण्या पर्यंत चितळे बाईंची मजल गेली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नको ती बडबड करणाऱ्या मनोरुग्ण चितळे बाईस खऱ्या अर्थाने "येड्याच्या इस्पितळाची गरज" निर्माण झाली आहे. यापुढे कुठल्याही मंचावरून मराठा यौद्धा मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षण आंदोलन विषयी अपशब्द वापरला तर महाराष्ट्रात चितळे बाईंचा एकही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. असा ईशारा संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा