बजरंग सोनवणे यांनी अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, धनंजय मुंडे यांना धक्का
परळी प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते तथा कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी बजरंग बप्पा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे .यांचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल.
मागील 2019 लोकसभा निवडणुकीत बजरंग बप्पा सोनवणे यांनी राष्ट्रवादी
काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवली होती त्यांचा विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी पराभव केला होता त्यानंतर बजरंग बप्पा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती त्यांचा केज अंबाजोगाई माजलगाव परळी आदी भागात मोठा जनसंपर्क आहे

तसेच धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून हे बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे पाहिले जात होते त्यांच्या जाण्यामुळे विरोधकांचे पारडे जड झाले असून लोकसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील आणखी एक मराठा समाजाचा मोठा नेता शरद पवार गटाकडे जाणार असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा