अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फाॅर्मसाठी तारीख वाढविण्याची मागणी
परळी ( प्रतिनिधी ) ऑनलाईन शिष्यवृत्ती फाॅर्म भरताना आलेल्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थी फाॅर्म भरू शकले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आणखी तारीख वाढवून देण्याची मागणी होत आहे.
अनेक वेळा संबंधित ऑनलाईन कॅफेमध्ये कधी इंटरनेट तर कधी वेबसाईट चालू बंद अशा समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थी वेळेत शिष्यवृत्ती फाॅर्म भरू शकले नाहीत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना आणखी शिष्यवृत्ती फाॅर्मसाठी वेळ द्यावा जेणेकरून कोणी वंचित राहणार नाही अशी मागणी होत आहे.
अडचणी लक्षात घेता अभियांत्रिकी व इतर अनेक कोर्सेस साठी विद्यार्थीचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्कॉलरशिप चे आॅनलाईन फार्म भरण्याची मुदत वाढवून मिळावी.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा