धम्म आचरणाने चांगले संस्कार घडतात - भन्ते शिवनी
परळी प्रतिनिधी. उपासक उपासिका यांनी आपल्या दैनंदिन जीवनात धम्माचे आचरण केल्यास आपल्या पाल्यावर चांगले संस्कार घडतात असे प्रतिपादन भन्ते शिवनी यांनी केले.ते परळीतील शिवाजीनगर येथे वर्षावास समारोप प्रसंगी धम्म देसना देतांना बोलत होते.
शहरातील शिवाजीनगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात भिमाई महिला मंडळाच्या वतीने आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासास प्रारंभ झाला होता. या समारोप कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेच्या रणखांबे सर, त्रिमिले सर,महिला तालुकाध्यक्ष प्रजावतीताई कांबळे, शहर सरचिटणीस रंजनाताई मस्के, यांच्यासह बौद्ध महासभेचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.संपूर्ण तीन महिने महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना मस्के यांच्यासह निर्मला आचार्य,विशाखा घाडगे,प्रमिला ढोके,सुषमा सरवदे,झिंझुर्डेताई, बनसोडे ताई,गायकवाड ताई,ढवळे ताई,व्हावळेबाई,उषा वडमारे,जगताप ताई, आचार्य ताई,आदी बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा