26 जून रोजी परळीत दैनिक सम्राटचा भव्य वाचक मेळावा व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण - रानबा गायकवाड समाजाच्या वतीने संपादकांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली

26 जून रोजी परळीत दैनिक सम्राटचा भव्य वाचक मेळावा व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण - रानबा गायकवाड 

समाजाच्या वतीने संपादकांना देण्यात येणार 51 हजार रुपयांची थैली 





परळी प्रतिनिधी.     आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र  व बहुजनांचा बुलंद आवाज दैनिक वृतरत्न सम्राटचा येत्या 26 जून रोजी परळीत भव्य वाचक मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती  परळी तालुका प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी दिली आहे.याच कार्यक्रमात महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरणही मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. तर दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने 51 हजार रुपयांची थैली देण्यात येणार आहे.
      26 जून हा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. जयंतीचे औचित्य साधून फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीचे मुखपत्र व महाराष्ट्रातील तमाम बहुजनांचा बुलंद आवाज असलेल्या दैनिक सम्राटचा वाचक मेळावाही परळीत आयोजित करण्यात आलेला आहे. याच मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक सम्राट तसेच स्मृतीशेष विजयकुमार गंडले प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे, जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येईल. 
   याबरोबरच दैनिक सम्राट चळवळीचे वृत्तपत्र असून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि शासन दरबारी आपला आवाज पोहोचवणारे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रास आर्थिक मदत म्हणून समाजाच्या वतीने या वाचक मेळाव्यात संपादक कुणाल कांबळे यांना 51 हजार रुपयांची थैली देण्यात येणाऱ असल्याचे परळी तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रानबा गायकवाड यांनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने