पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस परळीत होमहवन करून साजरा,हवनात जाळली लाकडे
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्राच्या पर्यावरण व दुग्ध विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस परळीत होमहवन करून साजरा करण्यात आल्याची घटना दिनांक 25 रोजी घडली आहे. या होमहवनात चंदनासह काही वृक्षांची लाकडे जाळण्यात आली आहेत. या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी पर्यावरणाला पोषक काम करण्याऐवजी हानी पोहचविण्याचेच काम केल्याची चर्चा होत आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा 26 जुलै हा वाढदिवस.या निमित्ताने परळी तालुक्यात परळी शहर व तालुका भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यापैकी दिनांक 25 जुलै रोजी शह
रातील आर्य समाज येथे ना.पंकजाताई मुंडे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी होमहवन आयोजित करण्यात आले होते.या होमहवनात चंदनाच्या लाकडाचे तुकडे, तसेच इतर काही झाडांची लाकडे जाळण्यात आली.यावेळी तुपासह सुंगंधी पदार्थांचा वापर करण्यात आला.
रातील आर्य समाज येथे ना.पंकजाताई मुंडे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी होमहवन आयोजित करण्यात आले होते.या होमहवनात चंदनाच्या लाकडाचे तुकडे, तसेच इतर काही झाडांची लाकडे जाळण्यात आली.यावेळी तुपासह सुंगंधी पदार्थांचा वापर करण्यात आला.
ना.पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आहेत.त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे.ना की वृक्षतोड.अथवा अशा प्रकारच्या होमहवनात किती लाकडे जाळण्यात आली हे महत्त्वाचे नाही तर कोणतेही लाकूड जाळले जाता कामा नये.उलट पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे गरजेचे होते.परंतू भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम करून पर्यावरणाला हानी पोहचविण्याचेच काम केले आहे अशी जनतेतून चर्चा होतांना दिसत आहे.
या होमहवन कार्यक्रमास परळी शहर व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला, पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा