जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परळीत सोमवारी भव्य निदर्शने,
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे
आवाहन
परळी प्रतिनिधी. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक पारित केले आहे या कायद्याच्या विरोधात परळीत सोमवारी जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक 21 जुलै रोजी भव्य निदर्शने आयोजित करण्यात आल्याची एका सर्वपक्षीय बैठकीत ठरविण्यात आले.
परळी शहरातील विशेष शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक 19 रोजी सायंकाळी पाच वाजता जन सुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस सत्ताधारी भारतीय जनता पार्टी वगळता राष्ट्रवा
दी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजय बुरांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अडवोकेट प्रकाश मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्या सह इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्य सरकारने आणलेला जनसुरक्षा हा कायदा सर्वसामान्य नागरिकांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे विविध पक्ष आणि संघटनांचा आंदोलनाचा मार्ग रोखणार आहे त्यापासून परावर्तन करणारा आहे सरकारच्या विरोधात जे कृती केली जाईल त्याला बेकायदेशीर ठरवून गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा डाव असल्याचे यावेळी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.
तसेच हा कायदा रद्द करण्यात यावा राज्यपालांनी या कायद्यावर स्वाक्षरी करू नये तसेच या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी परळी शहरातील मोंडा मार्केट येते सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तमाम परळीकरांच्या वतीने निदर्शने करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीस काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई, शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, शहर प्रमुख राजेश विभुते,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, उत्तम माने कॉम्रेड पांडुरंग राठोड, वंचितचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे, जगन्नाथ सोळंके, सय्यद जब्बार,मोशीन शेख यांच्या सह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा