धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध भूलतज्ञ डाॅ.अर्शद शेख यांचे मिलिंद विद्यालयात मार्गदर्शन*
परळी प्रतिनिधी. नाथ शिक्षण संस्था संचलित, मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज,परळी वै येथे संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त; संस्थेच्या सचिव सौ.राजश्रीताई धनंजयजी मुंडे व सहसचिव मा.श्री.प्रदीपजी खाडे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सप्ताहानिमित्त आज दि.१७ जुलै २०२५ रोजी परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध भूलतज्ञ डाॅक्टर अर्शद शेख साहेब यांच्याकडून 'प्रथमोपचार आणि आरोग्य व संतुलित आहार विहार विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फु
ले यांच्या प्रतिमेचे पूजन मालेवाडी येथील पालक श्री.माउली बदने यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक लाभलेले परळी वै.येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डाॅ.अर्शद शेख सर, मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर बी.जी.,पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर,मिलिंद ज्युनियर कॉलेजचे पाली विषयाचे प्राध्यापक श्री.सोनोने सर, मालेवाडी येथील विद्यार्थ्यांचे पालक श्री.माउली बदने साहेब इ.मान्यवर मंचावर उपस्थित होते.

आजच्या 'आरोग्य विषयक मार्गदर्शन' कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध भूलतज्ञ सन्माननीय श्री.अर्शद शेख साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार, आजच्या काळात विद्यार्थ्यांस अत्यावश्यक असलेला संतुलित आहार, व्यक्तिमत्व विकास या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर बी.जी.यांनी सभ्य समाजात वावरण्यासाठी आदर्श नागरिक हा शाळेतच घडतो व तो विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी नियोजित अभ्यासक्रमासोबतच संस्कार रूपी मुल्यांचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रूजवने ही आजच्या काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमास यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परस्पर संवादातुन एकरुप होवुन मार्गदर्शन ऐकले. यावेळी मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियरकाॅलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळे सर यांनी केले. आभार प्रदर्शन मिलिंद ज्युनियर कॉलेज मधील पाली विषयाचे प्राध्यापक श्री.सोनोने सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा