रोडरोलरखाली येवून युवकाचा मृत्यू
यश कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी
परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)
सोनपेठ आंबेजोगाई रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून या रस्त्याच्या रुंदीकरणावर रस्त्याचे रोलींग करत असताना रोडरोलरखाली येवून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे.यश कंट्रक्शनवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी काही काळ रस्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील नाथरा फाट्याजवळ सोनपेठ-आंबेजोगाई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्ता रुंदीकरणावर गाढे पिंपळगाव येथील युवक युवराज दत्तात्रय राऊत (वय २७) हा गेल्या दिड वर्षापासून यश कंट्रक्शन कंपनीमध्ये काम करत आहे. या कामावर गुरुवारी (ता.२०) सकाळी १० च्या सुमारास रस्ता रुंदीकरणाच्या कामावर रोडरोलरचे काम सुरू होते. अचानक युवराज राऊत या रोडरोलरखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. मृत्यू ऐवढा भयानक होता की युवराजचे शरीर वजनदार
रोडरोलरमुळे अक्षरशः चपटे झाले होते.युवराजच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त कुटुंबीयांनी काहीकाळ रास्ता रोको करत ड्रायव्हरवर कारवाई करुन कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क करताच घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान मयत युवराज राऊतचे पार्थिवावर सिरसाळा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा