शहरातील एक नामांकित इंग्रजी शाळा लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर, विद्यार्थी व शिक्षकांचे भवितव्य धोक्यात?
परळी प्रतिनिधी. शहरातील एक नामांकित अल्पावधीतच नावारूपाला आलेली इंग्रजी माध्यमाची शाळा लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.शहरातील शिक्षणप्रेमींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरात सध्या अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत.त्यात काही उच्च दर्जाच्या आणि सीबीएससी पॅटर्न शिक्षण देणाऱ्या आहेत.या शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्याही वाढली आहे.त्यामु
ळे मराठी माध्यमाच्या शाळांवर त्याचा परिणाम झाला आहे.पालकांचीही ओढ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढली आहे.
ळे मराठी माध्यमाच्या शाळांवर त्याचा परिणाम झाला आहे.पालकांचीही ओढ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढली आहे.
दरम्यान शहरातील अल्पावधीतच नावारूपाला आलेली तसेच विद्यार्थी संख्याही चांगली असलेली शाळा लवकरच काही कारणास्तव बंद पडणार असल्याची चर्चा होतांना दिसत आहे.या शाळेत सुमारे शंभर पेक्षा अधिक शिक्षक, कर्मचारी आपला उदरनिर्वाह चालवत असतात.ही शाळा बंद पडली तर विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा