सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मस्के यांना पत्नीशोक
परळी/प्रतिनिधी
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र मस्के यांच्या पत्नी सौ.नंदनी मस्के यांचे दिनांक ४ जानेवारी रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पा
र्थिवावर परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
र्थिवावर परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नंदनी मस्के या मागील काही दिवसापासून आजारी होत्या. अतिशय मनमिळाऊ आणि सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या नंदनी मस्के यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा