परळीत अमित शहाच्या फोटोला जोडोमारो आंदोलन, आंदोलन कर्त्यांनी शहाच्या राजिनाम्याची केली मागणी

परळीत अमित शहाच्या फोटोला जोडोमारो आंदोलन, आंदोलन कर्त्यांनी शहाच्या राजिनाम्याची केली मागणी 

    परळी प्रतिनिधी.       भारतीय राज्यघटनेचे भारत रत्न शिल्पकार भारतरत्न डॉ. 
 बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करून त्यांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला संविधान प्रेमी व तमाम आंबेडकर जनतेच्या वतीने परळी शहरात जोडमारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा याची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली.
     आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे तमाम आंबेडकर विविध पक्ष व संघटनांच्या वतीने तसेच शहरातील संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या
निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली उपस्थित  निदर्शकांनी यावेळी अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. त्यानंतर सर्व निदर्शकांनी भव्य अशी रॅली राणी लक्ष्मीबाई टावर ते  तहसील कार्यालयावर काढण्यात आली. येथे तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
    या आंदोलनात मोठ्या संख्येने भीमसैनिक, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, संविधान प्रेमी बांधव सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने