अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात अपंगांची हेळसांड
रुग्णालयाच्या डीनचे लक्ष आहे का?
अंबाजोगाई प्रतिनिधी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या अपंग रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असून याकडे रुग्णालय प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अपंग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील हेळम येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर लांडगे हे त्यांच्या अपंग आईला घेऊन अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात डोळ्यांच्या तपासणी करिता घेऊन गेले होते.परंतु त्यांना दवाखान्यात गेल्यानंतर साधी व्हिल चेअर मिळाली नाही किंवा कोणीही उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईला उचलून नेऊन डॉक्टरांना दाखविले.
अपंग व्यक्तीसाठी साधी व्हील चेअर नव्हती. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांनीही उडवा उडवीचे उत्तरे देऊन सहकार्य केले नाही.दवाखान्यातील कर्मचारी वर्गाच्या अशा बेजबाबदार वागण्यकडे रुग्णालयाचे डीन यांचे लक्ष आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.दवाखान्यात स्वछ्तेचा अभाव आहे, डॉक्टर पेशंटला बाहेरचे औषध,इंजेक्शन, गोळ्या लिहुन देतात. सर्वांनाच घेणे ते शक्य नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा उपयोग काय रुग्णालयात येणारे रुग्ण बोलत आहेत.
अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या सामन्य,अपंग,अंध माणसांची होणारी हेळसांड S. R. T रुग्णालयाने त्वरित थांबवावी असेही परमेश्वर लांडगे यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा