नरेंद्र मोदींनी देशातील 25 श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले - राहूल गांधी




नरेंद्र मोदींनी देशातील 25 श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले - राहूल गांधी 
नांदेड (सुभाष सवई )    नरेंद्र मोदींनी देशातील 25 श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले परंतु गरीबांना महागाईच्या खाईत लोटले त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांनी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले.
     महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नांदेड येथे आज दिं. १४ रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा पोटनिवडणूक उ
मेदवार प्रा. रविंद्र चव्हाण व विधान सभेच्या सर्व उमेदवारांना निवडून चव्हाण यांनी आव्हान केले. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे.संविधान हिंदूस्थानचा आत्मा आहे ते बदलण्याचे काम हे सरकार करित आहे. कांग्रेस पार्टी संविधानाचे रक्षण करित आहे.देशाचा विकास ,दलितांचे रक्षण , हरितक्रांती या पुस्तकाशिवाय होत नाही. नरेंद्र मोदीजीने देशातील २५ श्रीमंत लोकांचे कर्ज माफ केले. 
    महाष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आले तर महिलांना ३००० हजार रु दरमहा देण्यात येतील, शेतक-याचे ३लाख कर्ज माफ करु, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ महीलांना बस मोफत देऊ, देशातील प्रत्येक घटकाला विकासात भागिदार बनविण्याचे काम आम्ही करणार आहोत. असे राहूलजी आपल्या भाषणात ते म्हणाले महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले , अनेक लोक बेरोजगार झाले.महाराष्ट्रात सरकार नव्हती का असा सवाल पण त्यानी केला. 
    यावेळी लोकसभा पोटनिवडणूक उमेदवार रविंद्र चव्हाण व नायगाव मतदार संघातील मिनल खतगावकर , देगलूर मतदारसंघाचे कांबळे,  नांदेड उत्तरचे अब्दूल सत्तार, हदगाव लोहा मुखेड अशा नऊ विधानसभा व एक लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार मंचावर उपस्थित होते. डाॉ. सुनिल कदम, महिला आघाडी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मेघाताई चव्हाण, सुरेशदादा गायकवाड, प्रा. यशपाल बिंगे ,अमितभय्या देशमुख , शाम दरकजी व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सभेला उपस्थित होते. सर्व मतदार संघातील मतदार नागरिक व महीला खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने