परळी विधानसभेसाठी वैध अर्ज झालेल्या 48 पैकी 21 उमेदवार मुस्लिम समाजाचे
एससी, एसटी, ओबीसी, मराठा, समाजाच्या उमेदवारांचाही समावेश
परळी प्रतिनिधी. 233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दिनांक 22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली होती. तर दिनांक 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या 58 उमेदवारांची अर्जाची छाननी झाली. त्यापैकी 48 उमेदवारांचे अर्ज वैध झाले. या वैध झालेल्या 48 पैकी 21 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत.
दिनांक 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत एकूण 58 उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले होते त्या सर्व अर्जांची दिनांक 30 सप्टेंबर रोजी परळी उपविभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या समक्ष छाननी करण्यात आली. या छाननी मध्ये 15 जणांचे उमेदवारी अर्ज विविध कारणामुळे बाद करण्या
त आले त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 48 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
त आले त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 48 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
या 48 उमेदवारांपैकी सर्वाधिक 21 फॉर्म हे मुस्लिम समाजाच्या उमेदवारांचे आहेत. 21 उमेदवारामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मताची विभागणी होऊ शकते.त्यामुळे हे उमेदवार कुणाच्या फायद्याचे आणि कुणासाठी डोकेदुखी ठरणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
टिप्पणी पोस्ट करा