परळीतील भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी 12 ऑगस्ट पासून रानबा गायकवाड यांचे उपोषण
परळी प्रतिनिधी. परळी शहरात राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 110 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व टेंडर नुसार आणि दिलेला कालावधी लोटल्यानंतरही अद्यापही काम चालू आहे. या कामाची चौकशी करून संबंधित एजन्सीला काळया यादीत टाकावे दिरंगाई बद्दल दिलेला दंड वसूल करावा या मागणीसाठी पत्रकार रानबा गायकवाड यांचे दिनांक 12 ऑगस्ट पासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 110 कोटी रुपयांच्या भुयारी गटारी व रस्त्याचे काम लातूर येथील श्रीनाथ इंजिनिअरिंग यांना देण्यात आले होते. 16 सप्टेंबर 2019 मध्ये या योजनेचे काम परळी शहरात सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत शहरात भुयारी गटारी, अंडरग्राउंड नाल्या, ड्रेनेज सिव्हरेज लाईन, रस्ते व फुटपाथपाचे काम आदीं
चा समावेश आहे.
चा समावेश आहे.
शहरातील 25000 घरांचे सांडपाणी या योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन द्वारा शहराबाहेरील टाक्या पर्यंत नेण्यात येणार आहे .या योजनेचे जे चेंबर बांधले आहेत त्या चेंबरला शहरातील एकही घराच्या नालीचे सांडपाणीचे पाईप जोडण्यात आलेले नाहीत. किंवा गल्लोगल्ली येथील नाल्यांचे सांडपाणी या चेंबरमध्ये सोडण्याची कोणतीही सोय न करता चेंबरचे काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी चेंबर उंच आहेत तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांचे अपघातही होत आहेत.
संबंधित काम करणाऱ्या एजन्सीला 2019 मध्ये नगरपरिषदेने काम दिले होते. पाच वर्षे झाले तरी अद्यापही काम चालूच आहे. दोन वर्षात वेळेवर काम न केल्यामुळे नगरपरिषदेने सुमारे एक कोटी रुपयांच्या जवळपास दंड श्रीनाथ इंजिनिअरिंग यांना ठोठावला होता या दंडाची रक्कम नगर परिषदेला भरली नसल्याचेही समजते. याबरोबरच सदर योजनेचे काम होत असताना या कामाचा अनुभव नसणाऱ्या मजुरांकडून शहरात काम करून घेण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शहरात होणाऱ्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करणारी यंत्रणाच परळी नगरपरिषद किंवा संबंधित एजन्सीकडे नव्हती. त्यामुळे नागरिकांना सांडपाणी रस्त्यावर येऊन प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . अद्यापही हे काम चालूच आहे. भविष्यात आणखी किती वर्षे लागतील याचीही शाश्वती नाही.तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे . या कामाच्या गुणवत्तेचे संपूर्ण तपासणी करण्यासाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्यात येऊन कामाच्या गुणवत्तेची तसेच निकष्ट कामाची चौकशी करून दिरंगाईचा दंड सदर एजन्सी कडून वसूल करावा व सदर एजन्सीला काळ्या यादीत टाकावे या मागणीसाठी पत्रकार रानबा गायकवाड 12 ऑगस्ट पासून परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा