आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर लढ्याचे प्रणेते गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड
उद्या सायंकाळी 5 वाजता होणार अंत्यसंस्कार
औरंगाबाद (अँड नामदेव सावंत /महादेव पंडित)
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर लढ्यातील प्रणेते, आंबेडकर चळवळीतील एक अग्रगण्य नाव, चळवळीचे पितामह, माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे यांचे दिनांक 4 मे रोजी पहाटे 4.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीचे उपचार चालू होते. परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत शनिवारी पहाटे मावळली. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 5 मे रोजी सायंकाळी पाच वाजता उस्मानपुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रविवारी सकाळी कमलन बजाज येथून साडेनऊ वाजता पार्थिव बाहेर गाडीवर काढून महारॅली काढून रेल्वे स्टेशन मार्गे डॉ. बा
दिवंगत नेते गंगाधर गाडे यांच्या निधनाने पॅंथरची डरकाळी थांबली आहे आणि आंबेडकर चळवळ आज अग्नीडोंब थंडावलाआहे, गंगाधर गाडे म्हणजे संघर्ष आणि संघर्ष शिष्यवृत्ती वाढीची चळवळ, असेल किंवा नामांतर आंदोलन असेल किंवा नामांतर आंदोलन असेल गंगाधर गाडे यांनी संघर्ष शिगेला नेला होता. व तो संघर्ष यशस्वी करून दाखविला. या संघर्षामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची प्रचंड फळी निर्माण केली आणि एक एक तोला मोलाचा कार्यकर्ता उभा केला.
शेकडो झोपडपट्ट्या उभ्या करून लाखों बेघरांना घरे मिळवून दिली व शहरामध्ये त्यांचा स्वतः चा हक्काचा निवारा निर्माण केला.
त्याचबरोबर त्याला शहरामध्ये रोजगार मिळाल्याने त्यांचे कुटुंब उभे राहिले व मुलांचे भवि्तव्य त्या माणसाला घडविता आले अशाप्रकारे पत्रकार, वकील डॉक्टर, प्राद्यापक आणि प्रशासकीय अधीकारी सुद्धा बनविले, हे विधायक कार्य आहे.तसेच गंगाधर गाडे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांचाही सहवास लाभला त्यांनी अनमोल असा ठेवा विचार बाबासाहेबांचा गाडे यांना दिल्याचे सूर्यकांता ताई गाडे यांनी सांगितले आहे.
गंगाधर गाडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर गावागावांमध्ये खेड्या खेड्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल तर गोरगरीब असेल तर कुणीही दुबळा आदिवासी असेल तर अशालोकांना हजारो नाहीतर लाखो एकर गायरान जमीन अनेकांना मिळवून देण्याचे काम गंगाधर गाडेनी केलेले आहे.भूमीहीन व्यक्तींना त्या जमिनीचा मालक बनवलेला आहे. नामांतर लढ्यातील एक विराट मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर महसूल मंत्री व गृहमंत्री या महत्त्वाच्या मंत्र्यांनी 1989 पर्यंतच्या अतिगृहीत जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला याचा मी एक साक्षीदार आहे,असे रतनकुमार पंडागळे म्हणाले.
गंगाधर गाडे एका खेड्यांमधून औरंगाबाद सारख्या शहरात येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या शिक्षण केंद्र मिलिंद महाविद्यालयात शिक्षणा बरोबरच संघर्षाचे धडे घेतात आणि तेथूनच संघर्ष करीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठालामिळावे याकरिता त्यांनी संघर्ष केला
करतात व तो समाजाच्या कामी येतात.
गंगाधर गाडे यांचा अल्प परिचय
गंगाधर सुखदेव गाडे यांचा जन्म २१ नोव्हेंबर 1947 रोजी कवठाळ तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे झाला होता दहावी नंतर ते 1965 ला मिलिंद महाविद्यालयात आले होते विद्यार्थी दशे पासूनच त्यांनी नेतृत्वाची आवड होती विद्यार्थी चळवळीतील आंदोलनानंतर 19 72- 73 मध्ये त्यांनी दलित पॅंथर मध्ये राजा ढाले यांचे नेतृत्वाखाली काम केले.शहरातील बहुतेक मागासवर्गीय वसाहती त्यांनी बसविल्या होत्या आंबेडकरी त्यांचे मोठे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यापीठ नामांतर चळवळी त्यांचा मोठा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात त्यांना आठ महिने तुरुंगवासही भोगावा लागला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय असे कार्य केले आहे राजा ढाले यांनी दलित पॅंथर बरखास्त केल्यानंतर 1991 मध्ये त्यांनी भारतीय दलित पॅंथरच्या स्थापनेत पुढाकार घेतला 1999 मध्ये त्यांना परिवहन राज्य मंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती त्या काळात त्यांनी एस.सी. एस.टी. ओ बी सी साठी उल्लेखनीय असे कार्य केले सध्या ते पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते.
गंगाधर गाडे यांच्या मृत्यूचे वृत्त शहरात समजतात शहरातील अनेक नेते कार्यकर्ते यांनी गंगाधर गाडे यांच्या निवासस्थानाकडे धाव घेऊन मी सूर्यकांता ताई गाडे मुलगा डॉ.सिद्धांत गाडे यांची माजी मंत्री राजेंद्र माजी आमदार कल्याण काळे माझी महापौर रशीद मामू, गुरव कदम दौलतदादा खरात,मिलिंद,अण्णा शेळके,मधुकर चव्हाण, विजय मगरे, रतन कुमार पंडागळे, रमेश भाई खंडागळे, व्ही के मोरे,सर्जेराव मनोरे, रणजित साळवे, प्रवीण नितनवरे, रमेश दाभाडे, कृष्णा साळवे, किशोर जाधव साहेबराव नवतुरे, बाबुराव नरवडे, लताताई थोरात सचिन निकम अनिल भाऊ जाधव, अंजन साळवे, सोमनाथ महापुरे, राजूभाऊ किर्तीकर दैनिक सम्राट चे प्रतिनिधी महादेव पंडित ऍडव्होकेट नामदेव सावंत,आदी आंबेडकरी नेते कार्यकर्ते आदींनी भेट देऊन सांत्वन केले.
टिप्पणी पोस्ट करा