राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा - जयसिंगराव गायकवाड
मराठा आरक्षण विरोधी सरकार हद्दपार करा - उत्तमराव माने
परळी प्रतिनिधी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी केले.ते आज परळी तालुक्यात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
आज दि. 11 नोव्हेंबर रोजी पौळ पिंपरी बु. गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार जयसिंगराव गायकवाड संवाद बैठकीला मार्गदर्श
न करत होते.यावेळी जयसिंगराव गायकवाड यांनी आजही महाराष्ट्राला शरद पवार यांच्या शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले.तर जेष्ठ नेते उत्तमराव माने यांनी भ्रष्ट आणि मराठा आरक्षण विरोधी युतीचे सरकार आता हद्दपार करा व परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन केले.

या संवाद बैठकीला पिंपरी येथील गावकरी, कार्यकर्ते , गावकरी मंडळी व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा