जेंव्हा शरद पवार साहेब स्थानिक दैनिके चाळतात

जेंव्हा शरद पवार साहेब स्थानिक दैनिके चाळतात 

     परळी प्रतिनिधी. ( रानबा गायकवाड )   वयाच्या 85 व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार  वर्तमान पत्रांचे वाचक आहेत.हे परळीच्या सभेत दिसून आले.सभा चालू झाल्यानंतर पवार साहेब जेंव्हा स्थानिक दैनिके चाळताना दिसू लागले तेंव्हा स्थानिक प्रश्न जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता दिसून आली.ती उत्सुकता परळीकरांनी पाहिली.
      मोंढा मैदान येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देश
मुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा 9 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुरू झाली.वक्ते बोलत होते त्यावेळी शरद पवार यांच्या समोर टेबलावर असलेली स्थानिक दैनिके, जिल्हा दैनिके एक एक शांतपणे वाचत होते.
    दरम्यान सर्व पेपर पाहिल्यावर शरद पवार यांनी सर्व पेपर एकत्र जुळविले व व्यवस्थित पुन्हा ठेऊन दिले.एक नेता वयाच्या 85 व्या वर्षीही आपली वर्तमान पत्र वाचण्याची आवड कसा जोपासतो हे पत्रकार म्हणून अनुभवता आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने